हा देव अविनाशी
चला रे ! जाऊ शेगावी
गजानन ! संत - नमनाशी /
फिटे भवभ्रांतीची भीती
लाभते दर्शने काशी // धृ. //
दिगंबर रुप हे त्याचे
नसे मुळी भान देहाचे /
समाधी ध्यान हे त्यांचे
अखंडीत अंतरंगासी // १ //
जशी ज्याची असे भक्ती
तयाला दे तशी शक्ती/
मुमुक्षू देत विरक्ती
सारिखे दास आणि दासी // २ //
पहाता वेडीयावाणी
परिसता भासतो ज्ञानी /
वृत्ति गमते जसे पाणी
मिळाली धार स्वरुपासी // ३ //
कृपा होता तुटे व्याधी,
मिळे परमार्थिंया संधी /
म्हणे तुकड्या चला आधी
संत हा देव अविनाशी // ४ //
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा