/श्री// तुझी रे ! अगाध किर्ती मानवतेची महान मूर्ती // धृ. // साधेपणी रहावे विदेही सदा रमावे जगती तुझीच ख्याती // १ // गुरु लाभले आम्हाला शुद्धभाव सोबतीला घडू दे सदैव भक्ती // २ // तप - योग साधनेचा अवतार तू शिवाचा गोविंद म्हणे द्या स्फूर्ती // ३ // चिंचोली ( डांगे ) बुधवार दि. ८ जाने. २०२५