मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

श्री तुळशीची आरती

जय देव जय देवी जय माये तुळशी । निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥   ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी । अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥ सेवा करिती भावें सकळहि नरनारी । दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥ शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी  मंजिरिची बहु आवड कमलारमणासी  सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी  विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥ अच्युत माधव केशव पीतांबरधारी । तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥ त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी  गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥

सत्यनारायणाची आरती

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥ पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥   विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥ परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥ घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥ प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥ जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा   शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥ दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥ त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥ भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा   साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥ इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥ त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥ स्मृति हो‍उनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्ध्रिलें ॥ जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥ क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥ अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥ मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥ जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा   पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥ पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥ अंगध्वजरायासी पु...

लहानु बाबा धुप आरती

श्री संत लहानुजी महाराज प्रसन्न धुप आरती सच्चीत आनंदा ! आत्मारामा सुखकंदा जयदेव! जय ब्रह्मस्वरूपा।  श्री सदगुरुनाथा आरती ओवाळुनि  तव चरणी ठेवितसो माथा || धृ. || चन्द्रमण्डलांतर्गत निर्मख, ब्रह्मरन्ध्र-भुवनि।  एकविस स्वर्गावरती आसन,  साजे कुंजवाणी सहस्त्रदल-पंकजी विराजित  गुंफे माझारी।  अतसि कुसुमसम कांति झळके, शुक्लांबरधारी || १ || षडचक्रांचे देव वंदीले तिर्थाटन झाले व्दिदल पंढरपुरी सद्गुरु,  पाहुनि मन धाले।  सद्रूप चिद्रूप आनंदात्मा,  सज्जन दीनबंधु।  करुणासागर पूर्ण उजागर,  तारक भव-सिंधु ||२||  प्राणांपाने सोहंम सूत्रे,  काया-वाणी-मने।  त्रिगुण-ताटी प्रसाद अर्पण  केलासे सुमने रत्नजड़ित सिंहासन लखलख,  रंग रंग भरीले   चिन्मय मुर्ति ध्यान गुरुचे  सोज्वळ मनि धरिले ||३||  श्रवण पठन या प्रदक्षिणेने  गुरु वरदेश्वरिला  निजध्यासिता ज्ञान-दीपाचा  प्रकाश संचरला  अनुहत वेणु, शंख झांझरी,  घाघरिया वाजे  मृदंग, वीणा, टाळ नगारा,  गगनांबरी गाजे ||४||  गीता मंत्र पु...

श्री गजानन महाराज (शेगाव) आरती

श्री गजानन महाराज (शेगाव) आरती  जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया। अवतरलासी भूवर जड मुढ ताराया॥ जयदेव जयदेव..... निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी। स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी॥ तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी। लीलामात्रें धरिलें मानव देहासी॥ जयदेव जयदेव...... होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा। करूनी गणि गण गणांत बोते या भजना॥ धाता हरिहर (नरहरी) गुरुवर तूंचि सुखसदना। जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना॥ जयदेव जयदेव..... लीला अनंत केल्या बंकट सदनास। पेटविलें त्या अग्नीवाचूनी चिलमेस॥ क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस। केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥ जयदेव जयदेव...... व्याधी वारून केलें कैकां संपन्न। करविले भक्तालागी विठ्ठल दर्शन॥ भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण। स्वामी दासगणूचे मान्य करा कवन॥ जयदेव जयदेव...... जय जय सतचित-स्वरूपा स्वामी गणराया। अवतरलासी भूवर जड मुढ ताराया॥ जयदेव जयदेव.....

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता

  जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥ पराही परतली तेथे कैचा हा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥ दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

अष्टविनायक नमन

  अष्टविनायक नमन* स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम । बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम। लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम । ग्रामो रांजण संस्थीतम गणपति। कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।

मंत्रपुष्पांजली

  *मंत्रपुष्पांजली* ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।  ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । स मस कामान् काम कामाय मह्यं। कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नम: । ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो मरूतस्यावसन् गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।। एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नोदंती प्रचोदयात् । मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।। ।। गणपतीबाप्पा मोरया ।। ।। मंगलमूर्ती मोरया ||