शेगांवी चला !
उगिच कां बरळता ऐसे ?
बघितल्यावीण संताशी /
कळे कोणास वैभव ते ?
ओतल्या जरीही घनराशी // धृ. //
अवलिया संत ! शेगांवी
राहतो सांगती ऐसे /
पहातरि एकदा तेथे
जाऊनी मौज ती कैसी ! // १ //
हजारो लोक भक्तीने
लोळती नांव घेवोनी /
भेटतो-पावती त्यासी
ऐकिली किर्ती ही ऐसी // २ //
कितीतरी भव्य मंदिर हे
गमे जणु राजवाडाची /
वरी श्रीराम मंदिर हे
समाधी आत संताची // ३ //
ज्ञान घ्या, ध्यान घ्या कोणी
भक्ती घ्या, मुक्ती घ्या कोणी /
म्हणे तुकड्या दिसे तैसा
भावना हो जशी - तैसी // ४ //
जय गजानन माऊली
उत्तर द्याहटवाजय गजानन !!!
हटवा