गुरुप्रेम हृदयी धरा
मनाला स्थिर करवाया
धरी गुरु प्रेम हृदयी या /
तयाविण अन्य ना कोणी
मनाला बोधवी सखया // धृ. //
गुरु तो आदी अंतीचा
गुरु -अधिकार शांतीचा /
गुरु निवृत भ्रांतीचा
प्रगटला देह ताराया // १ //
तयाविण अन्य जे जाती
मिटेना भवभय- भ्रांती /
गुरु तो अंति सांगाति
कठिण भव - धार ताराया // २ //
तयाचे शब्द ऐकावे /
मनी स्थिरवूनि मुरवावे
तरिच पद मोक्ष ते पावे
भजा गुरुनाम वदनी या // ३ //
निभवला काळ तुकड्याचा
निभवी हा शब्द अंतीचा /
धन्य अधिकार तो त्याचा
किती वर्णू मी वदनी या // ४ //
जय गजानन !!!
उत्तर द्याहटवा