पहाता काय लोकांनो
जवळ ही, लाभली काशी /
साक्षात गुणराशी
पहाता काय लोकांनो
जवळ ही, लाभली काशी /
कशाला धावुनी जाता
उभा हा खास अविनाशी // धृ. //
तिथे पाषाण शोधावा
इथे प्रत्यक्ष ओलावा /
दोन्ही ही पावती भावा
अनुभवा येत सकळासी // १ //
संत हा प्रगट शेगांवी
हजारो लोक गाताती /
चला जाऊ तया शरण
चुके चौऱ्यांशिची फाशी // २ //
कसोटी उतरला भक्ता
गजानन ! संत योगी हा /
लाभला किर्तीचा साचा
सांगती दास आणि दासी // ३ //
समाधी भासतो जागा
दिसे जागेपणी विरला /
म्हणे तुकड्या धरा ग्यानी
दिसे साक्षात गुणराशी // ४ //
धन्यवाद सरजी!!!
उत्तर द्याहटवाजय गजानन माऊली !
हटवागण गण गणात बोते
उत्तर द्याहटवाजय गजानन !
हटवाGajanan Maharaj ki Jay
उत्तर द्याहटवाजय गजानन !!!
हटवा