जय देवा हनुमंता जय अंजनीसुता
ॐ नमो देवदेवा रामरायाच्या दूता
आरती ओवाळीन
ब्रम्हचारी पवित्रा || धृ.||
वानररुपधारी ज्याची अंजनी माता
हिंडता वनांतरी भेटी झाली रघुनाथा
धन्य तो राम्बक्त
ज्याने मांडीली कथा ||१||
सितेच्या शोधासाठी रामे दिधली आज्ञा
उल्लंघुनी समुद्रतीर गेला लंकेच्या भुवना
शोधुनी अशोकवना
मुद्रा टाकीली खुणा ||२||
सितेशी दंडवत दोन्ही कर जोडुन
वन हे विध्वंसिले मारिला अखया दारुण
परतोनी लंकेवरी
तव केले दहन ||३||
निजबळे इंद्रजीत होम करी आपण
तोही त्वा विध्वंशिला लघुशंका करुन
देखोनी पळताती
महाभूते दारुण ||४||
राम हो लक्ष्मण जरी पाताळी नेले
तयांच्या शुद्धीसाठी जळी प्रवेश केले
अहिरावण महीरावण
क्षणामाजी मर्दिले ||५||
देऊनी भुभु:कार नरलोक आटीले
दिनानाथ माहेरा त्वां स्वामिसी सोडविले
घेऊनी स्वामी खांदी
अयोध्येसी आणिले ||६||
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा