ॐ गुणवंत बाबा की आरती (चाल - लोपले ज्ञान जागी)
आरती महासंता गुरुराया समर्था |
भक्ति भावे ओवाळीतो
विश्वप्रभु गुणवंता || धृ.||
पिता तवा संपतजी माता सुलाई पोटी
अवतरली महामूर्ति
जन कल्याणासाठी ||१||
त्यागुनिया मोह माया।
घरदरा सखरा रंगविली ब्रह्मरंगी
केली पावन ती काया ।।२।।
गोजीरे हे रुप देवा आम्हा घडावी सेवा
तुमचिया पद कमळी
लाभे आरोग्य ठेवा ||३||
तव नाम दुःख हरति। येइ 'गणेशा' स्फूर्ति
संतोषीले नर नारी।
झाली जगभर किर्ती।।४।। आरती...
23
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा