हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली
तवठाई वृत्ती रमली
हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली….
विश्वाची चालक शक्ती
असशी तू प्रेमळ मूर्ती
देवादिक तुजला नमिती
गुण गाता रसना थकली
हे सरस्वती नमन
तुझ्या पदकमली…..
चौसष्ठ कला विद्येला
शास्त्रगुणी गुंफुनी माला
गणराज अर्पितो तुजला
करी वृष्टी सृष्टी सुफली
हे सरस्वती नमन
तुझ्या पदकमली….
विद्येचा छंद जयाला
तो नमिल देवी तुजला
तव कृपाकटाक्ष ही पडला
तत् कंठी विद्या ठसली
हे सरस्वती नमन
तुझ्या पदकमली…
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा