संतती योग मनकर्णिकबाई साऊरकर ह्या बेलूरकरांच्या आजी. रा. मो. बेलूरकांचे लग्नाला बारा वर्षे झालीत. पण संतती नाही. म्हणून म्हाताऱ्यांची मने थोडी दुःख होती. एक दिवस मनकर्णिकाबाई समर्थाचे दर्शना करिता आल्या. भक्तसंकटमोचन शांत बसले होते. मनकर्णिकाबाईने जाता बरोबर समर्थांचे पूजन केले. पाय धरले आणि मनोकामना आपल्या अंतरीच प्रगट केली. तसेच महाराज म्हणाले - 'बीज अंकुरले । रोप वाढिले ।' खरोखर तसेच झाले. पुढे अल्पावधीतच पुत्ररत्न प्राप्त झाले. मनकर्णिकाबाईस आनंद झाला. असा आहे. समर्थाचा पुण्यप्रताप तशी मनकर्णिकाबाईची समर्थांचे चरणी अपूर्व श्रध्दा. यामुळे अधिकच दुणावली. आसवां अशाच प्रकारे धनोडीचे श्रीराम नारायणराव देशमुख यांचे बरेच दिवसाचे लग्न झाले पण संतती नाही. तथापि त्यांचा पूर्ण विश्वास होता की, समर्थ आपले येथे वंशदिवा लावेलच. याप्रमाणे एक दिवस हे टाकरखेडला आले. समर्थांचे दर्शन घेतले. पूजन केले. पत्नी सौ. जिजाबाई सोबत होत्या. त्यांनीही समर्थांचे पूजन करून नमस्कार केला. समर्थांनी जिजाबाईचे पदरात एक फळ टाकले. तोच एक वर्षानी बाळाचा जन्म झाला. आज तोच श्रीरामपंत देशमुखांचा कुलदिप...