श्री संत लहानुजी महाराज संस्थान, टाकरखेड ता. आर्वी, जी. वर्धा
*लहानुजी बाबा का भरा बडा दरबार | छोटे बडे सभी आते होता है बेडापार ||
*श्री संत लहानुजी महाराज सेवाधारी प्रकल्प*
सप्रेम जयगुरु,
आदिनाथांपासून चालत आलेल्या श्रीसंत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज या संत परंपरेला प्रसादाचा तसेच सेवेचा वारसा लाभलेला आहे. याच परंपरेतील श्रीसंत लहानुजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यभर मुक प्राण्यांपासून ते मानवापर्यंत सर्वांचीच सेवा केली, तसेच आपल्या प्रत्येक कृतीतुन समाजाला मार्गदर्शन व उपदेशही केलेला आहे.
आपले आई-वडील, आजोबा हे संकटात असतांना श्रीसंत लहानुजी महाराजांनी त्यांचा आजार बरा व्हावा यासाठी कसा प्रसाद दिला, त्यांचेवरच्या संकटावर कशी मात केली, याचे अनेक दाखले आपण ऐकलेले असेल किंवा लिलामृत ग्रंथामध्ये वाचलेले असेल. तसेच आपलेही जीवन धन्य व्हावे, याकरीता आम्ही आपल्या आई-वडील, आजोबांचा वारसा जोपासत टाकरखेडच्या लहानुजी बाबांचे दर्शन घेत असतो.
श्रीसंत लहानुजी महाराज तपश्चर्येच्या कालावधीत गंगापुरला असतांना, श्रीरंग नावाचा गवळ्याच्या कुटूंबातील मुलगा असल्याचे भासवून साक्षात पांडूरंगानेही त्यांची ६ महिने सेवा केलीली आहे. आज श्रीसंत लहानुजी बाबा आपल्यात देह रुपाने नाहीत, परंतु त्यांचा प्रत्यक्ष वास समाधीस्थळी असल्याची अनुभूती आपण अनुभवत आहोत. त्यामुळेच अनेकांचे कल्याण झाल्याचे दाखले संतचरित्र व समर्थ्यांच्या लिलामृत ग्रंथामध्ये आढळतात.
अशा या संताचा परिसस्पर्श आमच्याही जीवनाला होऊन जन्म सार्थकी लागावा याकरिताच श्रीसंत गजानन महाराज
मंदिर, शेगांव येथे स्वयंसेवक अगदी मनोभावे सेवा करताना आम्हाला प्रकर्षाने जाणवते. त्यांची गजानन महाराज मंदिरातील
'माऊली' म्हणून घातलेली साद आणि आम्हाला मिळणारी 'विनम्र सेवा' पाहुन आम्ही दर्शनार्थी सुखावून जातो.
असा हा संत सेवेचा वारसा आपल्या लहानुजी बाबांच्याही मंदिरात असावा व आपल्या लहानुजी बाबांच्या सहवासात
आपल्यालाही संत सेवा घडावी, आणि त्यांच्या परिसस्पर्शाने आपल्याही देह, जिवनाचे सोने व्हावे, जीवन सार्थकी लागावे याकरिता श्रीसंत लहानुजी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र टाकरखेड येथे सेवकांची नोंदणी करण्याचा आमचाही मानस आहे. आपल्यालाही या संत सेवेचे पुण्य आपल्या पदरी असावे असे वाटत असल्यास, आपणही श्रीसंत लहानुजी महाराज संस्थान, टाकरखेड येथे प्रत्यक्ष भेट देऊन, सेवेकरिता आपल्या नांवाची नोंदणी करु शकता व या शाश्वत सेवेच्या परिसस्पर्शाने आपल्याही जीवनाचे सोने करु शकता.
सेवेने अंगी सामर्थ्य येते - राष्ट्रसंत
सेवाधारी भक्तास खालील प्रमाणे सुविधा व नियम अटी लागू राहतील
१. सेवाकाळा करीता राहणे व भोजन विनामुल्य राहील.
२. कुठलेही व्यसन करता येणार नाही.
३. सेवकास त्यांचे इच्छेनूसार व संस्थेचे आवश्यकतेनूसार विनामुल्य सेवा द्यावी लागेल.
४. नम्रता व स्वच्छता पाळणे बंधनकारक असेल.
५. सेवकास, सेवकाने ठरवुन दिलेला वर्षातील १ दिवस किंवा ७ दिवस सेवा देता येईल. (कायमस्वरुपी नाही)
६. आपले ओळखपत्र / आधारकार्ड सादर करणे बंधनकारक राहील.
७. पांढरे धोतर / सदरा टोपी अथवा पायजामा / शर्ट / टोपी हा वेष / ड्रेस परिधान करावा लागेल.
आपला विश्वासू
(सु.भ.पावडे)
कार्यकारी संचालक,
* तरी संस्थेचे कार्यालयात आपले नावाची नोंद करावी
संपर्क:
श्री अशोकराव पावडे - 9075391554
श्री परिक्षीत कडू - 9881707921
सौ.आशाताई पाथरे - 7276482257
श्री राजुभाऊ दिवे- 8623008399
श्री रणजित राऊत -9604954468
श्री.शरद पेठे -7020799410
श्री.भक्तराज गावंडे- 9309988283
श्री अरुणभाऊ हिवसे -8329052292
श्री अविभाऊ राऊत - 9923859323
श्री गंगाधरराव वानखडे 9049705026
श्री गोविंदभाऊ सावरकर 8788764017
डॉ प्रमोद जाने - 9823219067


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा