संतती योग
मनकर्णिकबाई साऊरकर ह्या बेलूरकरांच्या आजी. रा. मो. बेलूरकांचे लग्नाला बारा वर्षे झालीत. पण संतती नाही. म्हणून म्हाताऱ्यांची मने थोडी दुःख होती. एक दिवस मनकर्णिकाबाई समर्थाचे दर्शना करिता आल्या. भक्तसंकटमोचन शांत बसले होते. मनकर्णिकाबाईने जाता बरोबर समर्थांचे पूजन केले. पाय धरले आणि मनोकामना आपल्या अंतरीच प्रगट केली. तसेच महाराज म्हणाले - 'बीज अंकुरले । रोप वाढिले ।' खरोखर तसेच झाले. पुढे अल्पावधीतच पुत्ररत्न प्राप्त झाले. मनकर्णिकाबाईस आनंद झाला. असा आहे. समर्थाचा पुण्यप्रताप तशी मनकर्णिकाबाईची समर्थांचे चरणी अपूर्व श्रध्दा. यामुळे अधिकच दुणावली. आसवां
अशाच प्रकारे धनोडीचे श्रीराम नारायणराव देशमुख यांचे बरेच दिवसाचे लग्न झाले पण संतती नाही. तथापि त्यांचा पूर्ण विश्वास होता की, समर्थ आपले येथे वंशदिवा लावेलच. याप्रमाणे एक दिवस हे टाकरखेडला आले. समर्थांचे दर्शन घेतले. पूजन केले. पत्नी सौ. जिजाबाई सोबत होत्या. त्यांनीही समर्थांचे पूजन करून नमस्कार केला. समर्थांनी जिजाबाईचे पदरात एक फळ टाकले. तोच एक वर्षानी बाळाचा जन्म झाला. आज तोच श्रीरामपंत देशमुखांचा कुलदिपक किशोर म्हणजे समर्थांची कृपा.
परमार्थ साधनेकडे ओढ
शेती व गुरे राखण्याचा व्यवसाय. महिने व रोजदारीची कामे करणे शेण काढणे, पाणी भरणे, मालकांनी सांगितलेली कामे करणे हे लहानुने सात, आठ वर्षे केले. तसा लहानुचा स्वभावच लहानपणा पासुनच सरळ, गोड, मितभाषी व कुणाचेही मन न दुखविणारा. सेवाभावी. लहानू खुदच समजदार असल्याकारणामुळे तो निर्व्यसनी व निर्व्याज्य होता. खेडूत व गावंढळ मुलाबरोबर राहूनही त्याला त्यांचा संसर्ग बाधू शकला नाही. वाईटाचे अनुकरण कधी केले नाही. काट्यामध्ये फुल उमलावे अशी स्थिती लहानुची. अनुकरण केले असेल तर थोरांचे.
“आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी।” हे संत तुकारामांचे वचन त्यास सत्यसुखाचा शोध घेण्यासाठी सांगत होते. नित्याची संसारातील कामे गोड वाटत नव्हती. परमार्थ साधनेत मन रमत होते.
जन्माला कशाला आलो? करायचे काय? या नरदेहाचे मूल्य काय? इत्यादि गोष्टीचे चिंतन करून आपली मनोविचार दीप्ती स्वतःच प्रदीप्त केली. आता जीवनात योग्य परिवर्तन घडून आणल्याशिवाय खरे सुखप्राप्त होणार नाही व संचित असेल तशीच भावना. मानवी जीवन म्हणजे प्रभातीचा तारा. आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी व विशाल ध्येय सफल करण्यासाठी व्यक्तीभावाच्या पलीकडे जायला हवे. निरंहकारी व्हायला हवे, खऱ्या सुखाचे दानी संत आहेत.
संतांचिया सहज संगती ।सद्बोधाची फळे लाभती । प्रवृत्ती ते होय निवृतती। अंतरंगी ।। ग्रामगीता

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा