काही निवडक अनुभव साक्षात्कार
१) # दांडगे कुटुंब टाकरखेडचे वारकरी झाले.....
नांदगांव खंडेश्वर जवळील चिखली ( वैद्य) या गावातील रहिवाशी गृहस्थ श्री. बापुरावजी दांडगे यांच्या आयुष्यात १९६९ मध्ये एक असा प्रसंग आला कि त्यांच्याकडे असलेले ३ एकर शेत त्यांना सावकाराकडे गहाण ठेवण्या शिवाय पर्याय नव्हता. पत्नी सौ. मिराबाई लहान एक मुलगा व दोन मुली एवढे त्यांच्या परिवारातील सदस्य. आपल्या परिवाराच्या हितास्तव बापुरावजींना नाईलाजाने त्यांचे शेत १२०० रुपयात सावकाराकडे गहाण ठेवावे लागले. दिवसा मागुन दिवस निघुन जात होते परंतु बापुरावजी कडे सावकाराचे पैसे व्याजासहित परत करण्याची सोय जुळत नव्हती. काही दिवसांनी हिच रक्कम व्याजासहित १५०० रु एवढी झाली. बापुरावजीला गावामध्ये लोकांना तोंड दाखवायची लाज वाटु लागली. त्यांच्या कडे पाहुन लोकं हसायला लागले "आता तर बापुरावचे वावर गेले, बुडाले सावकाराकडं " वगैरे बोलभाषा लोकं बोलायला लागले. बापुरावजींना आणखीनच वाईट वाटू लागले. मनात वाईट विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली. एकीकडे पत्नी व लहानग्या मुलांचा विचार व दुसरीकडे कर्जाचा वाढता डोंगर. एके दिवशी बापुरावजींनी मनाचा पक्का निर्धार केला कि आता आपले जगणे व्यर्थ आहे, जीवनयात्रा संपवलेली बरी. पत्नी मुलाबाळांच्या भेटी घेतल्या व अमरावतीच्या दिशेने आत्महत्येचा विचार करत बापुरावजी निघाले. अमरावती येथील कृषिकेंद्रामधुन विषाची बाटली सोबत घेवुन भारत लॉजवर मुक्कामाला गेले. आत्महत्येचे विचारचक्र वेगाने फिरत होते. लॉजवर बेडला बेड लागुन लागुनच होते. बापुरावजी जवळ विषाची बाटली होतीच. बाजुच्या बेडवर एक गृहस्थ पांढरे वस्त्र परिधान केलेले विसावले होते. बापुरावजींना कशाची झोप,यांच्या मनात वेगळेच विचार सुरु होते त्याच वेळी लहान-लहान मुलांची सुद्धा आठवण त्यांना येतच होती. झोपेचे सोंग घेवुन बापुरावजी आजुबाजुच्या लोकांना न्याहाळत होते कि सानसुन झाले काय? लॉजवरील सर्व लोकं झोपले काय याचा अंदाज घेत होते. एवढ्यात बापुरावजींनी विषाची बाटली हातात घेतली व प्राशन करणार तेवढ्यात बाजुला विसावलेल्या व्यक्तीने बापुरावजींना विचारणा केली कि मी बऱ्याचवेळा पासुन तुझे निरिक्षण करतो आहे तु विषाच्या बाटलीला हात लावतो पुन्हा ठेवतो असे कोणते संकट तुझ्यावर आले आहे मला सांग? त्यानंतर बापुरावजींनी आपबीती त्या व्यक्तीला सांगीतली असता त्या गृहस्थाने आजच्या दिवस आत्महत्या न करण्याचा सल्ला बापुरावजींना दिला व मी सांगतो त्या ठिकाणावर जा म्हणाले काहीतरी नक्कीच मार्ग निघेल. ते ठिकाण म्हणजे उद्या सकाळी उठल्यावर अमरावती - नागपुर रोडवर खडका फाटा आहे व समोर टाकरखेडा नावांचे गांव आहे व तेथे श्री संत लहानुजी महाराज नावाचे संत आहेत त्यांचे दर्शन घे. कसेबसे बापुरावजींनी त्या व्यक्तीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला व झोपी गेले. तसा बापुरावजींना अध्यात्माचा काहीही गंध नव्हता. सकाळी उठल्यानंतर पाहते तर बाजुच्या बेडवरील व्यक्ती हजर नव्हते. बापुरावजींना वाटले कि गेले असावेत लाँज सोडुन परंतु त्यांनी सांगीतलेला संताचा पत्ता लक्षात ठेवला व टाकरखेडच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.नेमका पत्ता लक्षात ठेवुन बापुरावजी टाकरखेडला पोहचले. बाबांच्या दर्शनाला भक्तांची गर्दी होतीच. बापुरावजी दर्शनाला पुढे येताच लहानुजी बाबांच्या वाणीतुन उद्गार निघाले " रात्री तं जीव देत होता रे लाहन्या! " थोडा वेळ बापुरावजी आश्चर्य चकित झाले. मनात प्रश्न पडला कि यांना ईथे कसे माहिती झाले. परंतु आपली मुळ समस्या तर तशीच आहे. असे म्हणत बिडी पित-पित बापुरावजी झाडापाशी जाऊन उभे राहिले. त्यांच्या मामोमाग एक व्यक्ती हातात एक चिटोरा घेवुन आला व म्हणाला कि तुमच्या खिशातुन हा कागद पडला. त्यावर बापुरावजी म्हणाले कि माझ्याखिशात तर काहीच नव्हते. त्याच व्यक्तीने तो कागद उघडला त्यावर दोन आकडे लिहिले होते. तो व्यक्ती बापुरावजींना सांगत होता कि हा बावाजीनं तुला प्रसाद दिला. तो कागद घेवुन बापुरावजी निघाले व त्या आकड्याच्या माध्यमातून बापुरावजींना २००० रुपये मिळाले. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांना घरची आठवण झाली. ईकडे चार दिवसापासुन बापुरावजी बाहेर असल्यामुळे गावातील मंडळीची शोध मोहिम सुरुच होती. तेवढ्यात बापुरावजी गावात पोहचले सगळ्यांना बापुरावजीने सविस्तर हकिकत सांगीतली व मोठ्या भावाला सोबत घेवुन बापुरावजींनी सावकाराकडुन शेतीची कागदपत्रे सोडवली.
तरीपण आणखी ५०० रुपये बापुरावजीकडे शिल्लक राहीले. त्यात त्यांनी सन १९६९ मध्ये श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे १०१ रुपयाची देणगी दिली व पुरणपोळीचा स्वयंपाक बाबांना अर्पण केला. आजही ती पावती त्यांच्याकडे फोटोफ्रेम करुन बावाजीचा अनमोल ठेवा समजुन कुटुंबाने जतन करुन ठेवली आहे. आज त्यांचा मुलगा अशोकराव बापुरावजी दांडगे हे सहपरिवार त्यांची आई सौ. मिराबाई बा. दांडगे नांदगांव खंडेश्वर येथे सव्वालाखे कॉम्पेक्सच्या मागे दोन मजली भव्य ईमारतीमध्ये किराणा दुकान ; पिठ गिरणी व १२ एकर ओलीत शेत व तिन मुले व सुना नातवंडासमवेत गुण्यागोविंदाने राहतात. ज्या ठिकाणावरुन बावाजीचा अनुभव साक्षात्कार दांडगे कुटंबाला घडला त्या
चिखली ( वैद्य) या मुळ गावाला सुद्धा त्यांचे जुने घर आहे. तेव्हापासुन बावाजीच्या कृपाशिर्वादाने संपुर्ण दांडगे कुटुंब टाकरखेडचे वारकरी झाले.
जय लहानुजी !!!
संदर्भ :- लहानुजी स्वानुभव युट्युब चँनेल

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा