सेवक रामदास कळंबे एकवर्ष घरादाराचे दर्शन न घेता सेवा करू लागला. पत्नी सौ. विठाबाई त्या दिवशी फार बेचैन होत्या. नाड्या सुटल्या. मृतशय्येवर काढले. रामदासला निरोप आला. रामदास म्हणजे निग्रही सेवक. समर्थाचे आज्ञेविणा जायचे नाही व आपण परवानगीही मागायची नाही. "परदुःख द्रवही संत सुपुनिता" या त्रिकालज्ञ संतास हा सगळा प्रकार कळला. तेच म्हणतात - "रामदास तू आज घरी जा !" कळंबे उंबरखेडला जाण्यासाठी निघाले. वरदेला थोडे पाणी होते. केवटाने नाव टाकली. पार करून दिले. घरी गेले नसेल तर वरदा दोथडी तुडुंब भरली. घरात रडारड सुरू होती. श्रींचा तीर्थप्रसाद व अंगारा दिला. हेमगर्भाची मात्रा दिल्याप्रमाणे तेव्हाच पत्नी शुध्दिवर आली. पुढे समर्थांचे आज्ञेप्रमाणे रामदास दररोज येणे जाणे करायचा ! सौ. विठाबाईची प्रकृती पूर्ण बरी झाली. रामदासाची पूर्ववत् सेवा सुरू झाली. पुढे दिवाळी आली. महाराज म्हणतात "आप अपने घरको पंधरा दिनके लिये जाईये।" हिंदीमधून बोलले. टाकरखेडचे प्रेमी लोकांनी आग्रह केला. लक्ष्मीपूजन करून जा. शिरपुरचे गुलाबराव रंगारी व जळगावचे गोपाळराव चौबे तिथे होते. गुलाबराव म्हणतात "रामदासबुवा, समर्थाचे वाक्य मोडू नका. रामदासचेही हेच मत. रामदास घरी गेले. घरी शेतीचे व घराचे काम तसेच पडून होते ते आटोपले. घर दिवाळीच्या निमित्ताने साफ केले. आनंदाने दिवाळी केली. कार्तिक पौर्णिमेला पंधरा दिवस पूर्ण झाले. स्नान केले व घरून दिवाळीचा डबा घेतला आणि समर्थांचे सेवेत हजर झाले. तोपर्यंत सूर्यभान लांजेवार, पंजाबराव साबळे व बाबा वेरूळकर हे समर्थाचे सेवेमध्ये होते.
पुढे समर्थाचेच आज्ञेवरून पत्नीला टाकरखेडला आणले. दोघेही उभयता राहू लागले. देवळातील देवाच्या मूर्ती ह्या अचळ व जड असून या भूतळावर खरे चालते बोलते परमेश्वर असेल तर संत. याभावनेने हे उभयता सेवा करू लागले. रामदासला दोन मुले
होती ते सभोती फिरायचे. खेळायचे, रहायचे. पत्निने आश्रमाचीसडासंमार्जन, आड- झूड, स्वच्छता ठेवावी. आणि रामदासने समर्थ सेवा करावी. गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. महाराज म्हणतात. रामदास तुम ढाई महिने के लिये अपने गाँव जाईये ! गावकरी मंडळीचा निर्णय ठरला की, तुम्ही जावू नये. रामदासला समर्थाचे शब्द म्हणजे लक्ष्मण रेषा. सामानाची गाडी भरली. उंबरखेडला आले. पत्नी गरोदर होती. घरी गेल्यावर आठ दिवसात मुलाचा जन्म झाला. समर्थाचे दूरदर्शित्व लक्षात आले.
महाराजांचे पूढे स्वास्थ बिघडले. रामदासला कळले. मन तळमळत होते. पण रामदास महाराजांनी दिलेला शब्द पूर्ण झाला नाही म्हणून जात नव्हते. तोपर्यंत कोळपणे वगैरे शेतीकाम करू लागले. बरोबर अडीच मास पूर्ण झाले. त्याच दिवशी महाराजांनीही सेवकास पाठविले. रामदास शेतात होता. सेवक तिथे गेला. यादव हरिजनास डवऱ्यास लावले व रामदास समर्थचरणी येवून हजर झाला. महाराजांचे अंग दुखत होते. निर्गुळीचे पाल्याने शेकले. बरे वाटायला लागले व परतोडची तयारी केली. समर्थ परतोडला गेले. बोकेच्या वाड्यात थोडी उसंत घेतली. आळणी, चटणी व भाकरीचे भोजन केले व निघाले आडमार्गाने. जळगावला आले. तो दिवस म्हणजेशनिवार १९/८/६४. पुर्ववत मारूतीवर आसन मांडले. पोळा व गोकुळ अष्टमी तिथेच केली. जळगावला पावले टेकली जळगाव पावन झाले.
तेथून सरळ निघाले व ते सरळ टाकरखेडला आले.
संदर्भ :-
श्रीसमर्थ लहानुजी महाराज जीवन-दर्शन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा