अकोल्याचे डाँ. चेडे साहेबांचे अनुभव / साक्षात्कार......
३) @ तापडीया नगर अकोला येथे श्री संत सत्यदेवबाबांनी बावाजीचे मंदिर बांधायला लावले......
सध्याचे अकोला निवासी डॉ. सुरेशचंद्र अंबादासपंत (अण्णासाहेब) चेडे हे लहानुजी बाबांचे निःसीम भक्त. सन १९६८ पासुन डाँ. साहेब लहानुबाबांच्या सेवाकार्यात रुजु झाले. स्वतः १९७८ मध्ये ते पंजाबराव कृषी विद्यापीठ (PKV) नागपुर येथे विभाग प्रमुख व महाराजबाग प्राणीसंग्रहालय प्रमुख या पदावर कार्यरत होते. अनेक मान्यवर व्यक्ती त्यांच्या सहवासात यायच्या त्यापैकी नागपुर विद्यापीठाचे कुलगुरु कै. दादासाहेब काळमेघ ; रावसाहेब देशमुख ; डॉ.श्री. कैकणी ; लहानुदास स्व. भगवंतरावजी पावडे ; ईत्यादी मंडळी. त्याकाळी टाकरखेडला जायला व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे
आर्वी वरुन पायी जावं लागायचं मुखी लहानुबाबांच नामस्मरण व भक्तांना आलेल्या अनुभवांच्या चर्चा करत टाकरखेडा गाठायचे व समर्थांचे दर्शन घ्यायचे असा नित्यक्रम सुरु होता.
अशातच एकदा त्यांच्या मित्रांच्या आध्यात्मिक चर्चा सुरु असतांना असे ठरले कि व्रजेश्वरीच्या स्वामी मुक्तानंद महाराजांकडे आपण गेलो पाहीजे रेल्वे रिझर्व्हेशन सुद्धा ठरले. त्याच रात्रीला बावाजींनी डाँक्टरांना स्वप्नात दर्शन दिले कि " मी आणि स्वामी मुक्तानंद महाराज एकच अंश आहोत तू तिथे जाऊ नकोस मी तुला चरण पादुका देतो."
असा स्वप्न दृष्टांत बाबांनी दिल्यानंतर डॉ. साहेब निवांत झाले काही दिवसानंतर मनात चंचलता निर्माण झाली कि बाबांनी तर स्वप्नात सांगीतले परंतु अद्यापही चरणपादुका मिळाल्या नाहीत. त्याच वर्षी संस्थानने बावाजीचा जन्म शताब्दि महोत्सव साजरा करण्याचे ठरवले. त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना बोलावण्यात आले डाँ. साहेब सुद्धा उपस्थित होते. त्यांना पुष्पवृष्टी करण्याचा बहुमान सुद्धा मिळाला.
एका मागुन एक मान्यवरांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. मला वाटले आपलाही याच पद्धतीने सत्कार होईल परंतु बाबांनी सांगीतल्या नुसार श्री संत अच्युत महाराजांच्या हस्ते डॉक्टरांना बावाजीच्या चरण पादुका देण्यात आल्या. डॉक्टरांना गहिवरुन आले त्यावेळी डॉ. साहेब नागपुरला सरकारी क्वार्टरवर रहात असल्यामुळे तिथेच चरण पादुकांची नित्य सेवा सुरु झाली ती आजही कायम आहे. त्यानंतर डॉ. चेडे साहेबांनी नागपुरला असतांना त्या चरण पादुकांचा पुजन सोहळा साजरा केला. विमानातुन पुष्पवृष्टी करण्यात आली. तेव्हापासुन डाँ. साहेब बावाजीच्या अनेक कार्यक्रमात अग्रणी असायचे. १९८७ मध्ये श्री संत सत्यदेवबाबांनी सालबर्डी येथे यज्ञाचे आयोजन केले या यज्ञाची प्रमुख म्हणून जबाबदारी डॉ. साहेबांवर सोपवण्यात आली. १९३७ मध्ये याच ठिकाणी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा यज्ञ केला होता. यज्ञ आटोपल्यानंतर श्री संत सत्यदेवबाबा डाँक्टर साहेबाच्या नागपुर येथील घरी गेले तिथे त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसची श्री संत लहानु बाबांची मुर्ती बघीतली त्याच क्षणी श्री संत सत्यदेव बाबांनी डॉ. साहेबांच्या वडीलांना कै. अण्णासाहेब चेडे
यांना सांगीतले की तुम्ही अकोला येथील निवासस्थानी लहानु बाबांचे येथील मंदिर बांधावे. वडीलांच्या मनाची अवस्था होय म्हणण्याचे धाडस करत नव्हती कि नित्य पुजेचे कसे होणार. त्याच वर्षी श्री सत्यदेव बाबांचा शेगांव येथे सत्कार सोहळा होता सोबत बरीच मंडळी येणार होती. सोहळा आटोपल्यानंतर परत एकदा श्री सत्यदेव बाबा अकोल्याला आले त्यादिवशी त्यांचे स्नान वगैरे डाँ. साहेबांच्या आई वडीलांनीच केले. त्यानंतर बाबांनी मंदिराकरिता आवारातील जागा सुचवली व पुजन केले. यानंतर काही दिवस लोटले मंदिराचे काम काही केल्या सुरु होत नव्हते. श्री संत सत्यदेवबाबांच्या नंतरच्या भेटीत मात्र डॉ. साहेबांच्या वडीलांकडुन बाबांनी मंदिर बांधण्याचे वचनच घेतले. तद्नंतर मंदिर बांधण्यात आले. जयपुरला स्वतः डॉ. साहेबांनी जावुन मुर्तीचा ऑर्डर दिला व विधीयुक्त समारंभ
पुर्वक लहानुजी बाबांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. आजही वार्षिक जयंती व पुण्यतिथी ऊत्सव तापडीया नगर अकोला येथे डाँ. साहेबांच्या घरी मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.
डॉ. साहेबांचे भाऊ डाँ. नरेशचंद्रजी चेडे हे सुद्धा अलिकडेच सेवानिवृत्त झाले त्यांच्या पत्नी श्रीमती शैलजाताई व डॉ. सुरेंद्रजी चेडे यांच्या पत्नी सौ. आशालताताई या संपुर्ण परिवाराला श्री संत सत्यदेवबाबांचा कृपाशिर्वाद आहेत. सालबर्डी यज्ञाची सांगता म्हणुन श्री. इंगोले यांच्या शेतावर जेवणाचा प्रसाद आयोजीत करण्यात आला होता त्यावेळी श्री संत सत्यदेवबाबा यांनी डाँ. चेडे साहेबांना प्रसाद दिला व सांगीतले कि " आम्ही भाकरि देतो आहे! " तेथुन दोन वर्षांनी चि. हरि नावाचे अनमोल पुत्र रत्न या चेडे कुटुंबाला लाभले. हा सर्व श्री संत लहानुजी बाबा : श्री संत सत्यदेवबाबांचा प्रसाद आहे असे ते सांगतात. अनेक साक्षात्कार या कुटुंबाला घडले डॉ. नरेशचंद्रजी चेडे यांच्या मुलीला टिल्लु पंपच्या शाँक मधुन सुद्धा बाबांनी लिलया वाचवले.२०२३ मध्ये स्वस्तिवाडेगांव येथे पहिल्यांदा श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा येथुन पालखी निघाली परतीच्या प्रवासात चेडे परिवाराने पालखीचे भव्य स्वागत केले यथोचीत आदर सत्कार करण्यात आला.
अजुनही डाँ. सुरेशचंद्रजी व डॉ.नरेशचंद्रजी चेडे व संपुर्ण परिवार यांची तितकीच निष्ठा श्री संत
लहानुजी बाबांविषयी ; श्री संत सत्यदेवबाबांविषयी आहे. प्रत्येक सेवा कार्यात या संपुर्ण परिवाराचा
सहभाग असतोच......
जय लहानुनाथा !!!
संदर्भ :-
लहानुजी स्वानुभव युट्युब चँनेल

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा