लहानुभक्त स्व. माधवराव लादे ; सातरगांव
सुदैवाचा ठेवा
माधवराव लादे हे सातरगावचे राहणारे. साधा, भोळा माणूस तपोनिष्ठ श्रीलहानुजी बाबांच्या प्रखर कीर्तीमुळे हे टाकरखेडकडे वळले. माधवरावची अखंड सेवा सुरू झाली. शुध्द सेवेपायी समर्थाचे मन प्रसन्न झाले. पाचवर्षे कशी गेली आठवले नाही. "खऱ्या सेवकाची स्थिती ओळखावी । व्यवस्था पाहिजे तैशी करावी ।।" कधी कुणाशी काही न बोलणारे बाबा एक दिवस हाक मारतात-
"माधवराव !"
"जी बाबा !" अशी हाक देत माधवराव धाऊन आले.
"तुम्ही गावी जा तुमचे काम झाले. तुमची सेवा
संपली !"
"का बरं बाबा? काही चुकले का या सेवकाकडून ?"
माधवरावांना अपार दुःख झाले. आपले काही चुकले तर नसेल ना? काय झाले असेल ? समर्थांनी का म्हटले असेल असे? असे विचार तरंग उठत होते. माधवरावांचा हृदयसागर हेलावत होता. लगेच समर्थ म्हणाले - "तुमची चाकरी पूर्ण झाली. हे घ्या तुमच्या सेवेचे फळ !" म्हणून पायातील पादुका काढल्या व माधवरावांच्या स्वाधीन केल्या. माधवरावांनी त्या अमूल्य ठेव्याचा सहर्ष स्विकार केला आणि स्वामीचे चरण धरले व ढसाढसा रडू लागले. ते एकाच गोष्टीसाठी की, समर्थापासून आपण आज दूर होत आहोत म्हणून. समर्थांनी धीर दिला. "रडू नकोस अरे!" मी तुमच्या सर्वांच्या नेहमी जवळ आहे. स्मरण करीत जा ! जिथे तुम्ही माझे स्मरण कराल तिथे मी उभा राहीन. ह्या खडावा घरी घेऊन जा व पूजा आरती करीत जा ! माधवरावांच्या मनात समर्थांच्या
चरण पादूका मिळाव्या ही तळमळ चालू होतीच. भरतास मर्यादाशील पुरूषोत्तमाने खरे धन दिले. सुदैवाचा ठेवा फलद्रुप झाली. पादुकांचे महत्व राष्ट्रसंत सांगतात.
बेडर - बनो इस हाथ लेकर, सद्गुरू की पादुका । निर्भर रहो धोखा नही, किस बात के फिर जादुका ।। न्हावो सदा गुरू की चरणरज, को उठाकर शीशपर। तो माल क्या संसार है? कुदे-चढेंगे ख्यालपर ।। (ल.ब.)
या भरताने त्या "शिरी घेऊनी भूषण पादुकेला" घरी आणल्या. देव्हारी स्थापन केल्या. यानंतर पुन्हा पुढे दोन वर्षांनी यांना समर्थांनी एक छत्री दिली. खरोखरच माधवरावावर श्रींनी कृपेची छाया केली.
संदर्भ :-
श्री संत लहानुजी महाराज जीवन - दर्शन
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा