मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

तुझीरे अगाध किर्ती

 /श्री// तुझी रे ! अगाध किर्ती मानवतेची महान मूर्ती   // धृ. // साधेपणी रहावे विदेही सदा रमावे  जगती तुझीच ख्याती // १ // गुरु लाभले आम्हाला शुद्धभाव सोबतीला  घडू दे सदैव भक्ती // २ // तप - योग साधनेचा अवतार तू शिवाचा  गोविंद म्हणे द्या स्फूर्ती  // ३ // चिंचोली ( डांगे ) बुधवार दि. ८ जाने. २०२५
अलीकडील पोस्ट

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Lahanusadhana app (hereby referred to as "Application") for mobile devices that was created by (hereby referred to as "Service Provider") as a Free service. This service is intended for use "AS IS". Information Collection and Use The Application collects information when you download and use it. This information may include information such as Your device's Internet Protocol address (e.g. IP address) The pages of the Application that you visit, the time and date of your visit, the time spent on those pages The time spent on the Application The operating system you use on your mobile device ...and more. The Service Provider may use the information you provided to contact you from time to time to provide you with important information, required notices and marketing promotions. For a better experience, while using the Application, the Service Provider may require you to provide us with certain personall...

रेल्वे प्रवासातील गुंडांच्या तावडीतून बाबांनी वाचवले

             // सद्‌गुरु समर्थ लहानवें नम : // श्री. सुरेशराव रघुपतीराव देशमुख टाकरखेड आर्वी यांचेवर ओढवलेला प्रसंग जाको राखे साई, मार सकेना कोई || हिन्दीतील वरील वाक्प्रचारासारखाच प्रसंग माझेवर आला असता समर्थ लहानुजी बाबांनी माझे कसे प्राण वाचविले त्याबाबतचा हा लेखन प्रपंच… साधारणत: सन १९७३-७४ मधील ही घटना आहे. आजही ती घटना जणू काही काल परवाच घडून गेली इतकी ताजी आहे. घटना कशी घडली त्याचे सविस्तर वर्णन… माझी चुलत बहीण सौ. लताताई भाऊसाहेब पवार, भडगांव जि. जळगांव ( खानदेश ) हिला दिवाळी निमित्त्य घ्यायला जायचं होते. पुलगांव ते जळगांव साधारणतः सात - आठ तासांचा प्रवास होता. रात्री ११. ३० वाजता पुलगांववरुन बसायचं ठरलं. रात्रीच्या गाडीला वेळ असल्यामुळे जेवणाचा डबा आणला होता जेवण केले. गाडी बरीच लेट होती. जशी गाडी स्टेशनवर आली तशीच प्रवाशांची गर्दी अतोनांत झाली. माझ्याकडे जनरलची तिकिट होती. थंडीचे दिवस असल्यामुळे सर्वच डब्याचे दरवाजे बंद होते कुणीही दरवाजे उघडत नव्हते. एवढ्यात गाडी सुटण्याची वेळ झाली व गाडीने हळूहळू वेग धरायला सुर...

लहानुबाबा दीन दु:खीतांचे कैवारी

    लहानुबाबा दीन दु:खीतांचे कैवारी दुःखीतांचे कैवारी श्रीसमर्थ लहानुजी महाराजामध्ये सद्गुरू कृपेने आत्मज्ञानाची फळे यायला लागली. निष्काम सेवेने जनप्रिय झाले. "जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्य सांभाळावी" आहे मन निर्विकारी झाले. चित्तचतुष्ट निरोधन केले. आत्मरत वृत्ती झाली. जगती जनार्दन ।। दिसायला लागला. दीनदुःखीतांच्या क्लेशात सहभागी व्हायला लागले. गंगापूर । क्षेत्री वनौषधी देऊन कित्येकांना व्याधी मुक्त केले. त्यात धन्यता वाटायला लागली. संतांची पायवणी घेण्यास जनमनाची लाज मानली नाही. शरीर कष्टवून जेवढा परोपकार करणे शक्य होईल तेवढा परोपकार करायचे. देवपूजा, राऊळी परिक्रमा, एकादशी करणे, व्रत उद्यापनासारखे धार्मिक विधिकृत्ये कमी झाली. उलट मंदिराकडून कोणी जाणारा पांथस्थ भेटला तर त्याची विचारपूर करायचे. त्याचे जवळ ओझे असेल तर ते आपणाकडे घेऊन त्यांचा भार हलका करायचे. आपलीच स्वतःची धड सोय नाही, पायही लांब होऊ शकत नाही एवढी जागा, पण त्या मर्यादित कुटिचे गंगापूर स्थळी पथिकास ते आसरा द्यायचे. प्रवाशास कुणाचे घर पाहिजे असेल तर ती व्यवस्था करायचे. सोय नसेल तर आपणाकडे आश्रय द्यायचे. ते म...

राष्ट्रसंत व लहानुजीबाबा

  // द्वय गुरुबंधु // तुम्ही दूर पर्यंत दिवे लावाल ! श्रीसमर्थ लहानुजी महाराजांच्या भेटीस मधून मधून वं. तुकडोजी महाराज येत असत. या गुरूबंधूचे नाते नातेवाईका प्रमाणे नव्हते. वं. तुकडोजी महाराज व वरखेड क्षेत्रातील काही मंडळी मिळून टाकरखेडला आली. वं. तुकडोजी महाराज बाहेर दारावरच असतील तर आत लहानुजी महाराजांची हालचाल चालू झाली. दर्शनप्रेमीही आले होते. त्यांन काढून दिले. बाबांनी म्हटल्यावर कोणी थांबत नव्हते त्यांचे पुढे. कारण त्यांचे वाग्बाण म्हणजे "जब बाण छूटे शब्द के, लागे हृदयथरकापने।" (ल. ब.) पुष्कळांना महाराजांच्या शब्दांचा गोड व कटू अनुभव आल्याकारणामुळे त्यांचा शब्द सहसा कोणी मोडित नसे. त्यामुळे पुष्कळदा सेवकांची गरज न पडता योग्य वातावरण तयार होत होते. बाबा स्वगतच गुणगुणायला लागले. "आपले येथे तर आज कवी नारायण आलेत ! आदिनारायण आलेत !!" वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ते 'कवीनारायण' म्हणायचे. वं. महाराज आत गेले. समर्थास पुष्पमाला अर्पण केली. वं. तुकडोजी महाराजांचा हातधरून समर्थांनी आदर दृष्टीने खाली बसविले आणि सकुशल विचारू लागले. "कसे काय येणे झाले?...

संत रघुनाथबाबांचे अनुभव / साक्षात्कार

  लहानुभक्त आर्वीचे संत रघुनाथबाबा आर्वीस प्रथम शुभास्तेपंथान हिवाळी दिवस. कार्तिक मास तो. जिकडे तिकडे सर्व आबादीचे वातावरण, शेतकरी आपली कामे आटोपून पुढे येणाऱ्या पिकाची वाट पहात होते. तिथे याच महिन्यात रघुनाथबुवांनी भागवत सप्ताह आरंभिला. रघुनाथबाबा विव्दान, श्रध्दाळू व कर्मकांडात प्रविण माणूस. बाबांच्या पदांबुजी अगाध प्रेम रघुनाथबोवाचे. आपल्या भागवत सप्ताहाची समाप्ती श्रीलहानुजी महाराजांच्या पावन उपस्थितीत व्हावी ही आत्मिक तळमळ. पण या कार्यक्रमाचे निमंत्रण देणार कोण या नरसिंहरूपास ? कुणाची प्राज्ञा आहे पुढे येण्याची? पण सद्भक्तांचा हेतु समर्थांनी ताडला. इकडे रघुनाथबोवा आतल्याआत तळमळत होते. तसेच टाकरखेड क्षेत्राच्या ठिकाणी हे ब्रह्मर्षी तळमळत होते. शेवट मनातील भक्तप्रेमाचा आवेग असह्य झाला. बाबा म्हणाले की, "उद्या आपल्याले आर्वीले जायचे आहे ! रेंगी-बैल तयार करा !" सेवक मंडळी भ्रमात पडली. स्थिरतत्वज्ञ महाराज टाकरखेडला कडूकडे आले तेव्हापासून कुठेही गेले नाहीत. आता कशाला जाणार आवींला? हे काही तरी नेहमीप्रमाणे गुणगुणत असावे म्हणून सेवकांनी व कडूंनी दुर्लक्ष केले. निश्चिंत राहिले. ...

लहानुसेवक स्व. रामदासजी कळंबे अनुभव / साक्षात्कार

लहानु सेवक स्व. रामदासजी कळंबे  संकट मोचन नाम तिहारो सेवक रामदास कळंबे एकवर्ष घरादाराचे दर्शन न घेता सेवा करू लागला. पत्नी सौ. विठाबाई त्या दिवशी फार बेचैन होत्या. नाड्या सुटल्या. मृतशय्येवर काढले. रामदासला निरोप आला. रामदास म्हणजे निग्रही सेवक. समर्थाचे आज्ञेविणा जायचे नाही व आपण परवानगीही मागायची नाही. "परदुःख द्रवही संत सुपुनिता" या त्रिकालज्ञ संतास हा सगळा प्रकार कळला. तेच म्हणतात - "रामदास तू आज घरी जा !" कळंबे उंबरखेडला जाण्यासाठी निघाले. वरदेला थोडे पाणी होते. केवटाने नाव टाकली. पार करून दिले. घरी गेले नसेल तर वरदा दोथडी तुडुंब भरली. घरात रडारड सुरू होती. श्रींचा तीर्थप्रसाद व अंगारा दिला. हेमगर्भाची मात्रा दिल्याप्रमाणे तेव्हाच पत्नी शुध्दिवर आली. पुढे समर्थांचे आज्ञेप्रमाणे रामदास दररोज येणे जाणे करायचा ! सौ. विठाबाईची प्रकृती पूर्ण बरी झाली. रामदासाची पूर्ववत् सेवा सुरू झाली. पुढे दिवाळी आली. महाराज म्हणतात "आप अपने घरको पंधरा दिनके लिये जाईये।" हिंदीमधून बोलले. टाकरखेडचे प्रेमी लोकांनी आग्रह केला. लक्ष्मीपूजन करून जा. शिरपुरचे गुलाबराव रंगारी व ...