काही निवडक अनुभव साक्षात्कार १ ) # दांडगे कुटुंब टाकरखेडचे वारकरी झाले... .. नांदगांव खंडेश्वर जवळील चिखली ( वैद्य) या गावातील रहिवाशी गृहस्थ श्री. बापुरावजी दांडगे यांच्या आयुष्यात १९६९ मध्ये एक असा प्रसंग आला कि त्यांच्याकडे असलेले ३ एकर शेत त्यांना सावकाराकडे गहाण ठेवण्या शिवाय पर्याय नव्हता. पत्नी सौ. मिराबाई लहान एक मुलगा व दोन मुली एवढे त्यांच्या परिवारातील सदस्य. आपल्या परिवाराच्या हितास्तव बापुरावजींना नाईलाजाने त्यांचे शेत १२०० रुपयात सावकाराकडे गहाण ठेवावे लागले. दिवसा मागुन दिवस निघुन जात होते परंतु बापुरावजी कडे सावकाराचे पैसे व्याजासहित परत करण्याची सोय जुळत नव्हती. काही दिवसांनी हिच रक्कम व्याजासहित १५०० रु एवढी झाली. बापुरावजीला गावामध्ये लोकांना तोंड दाखवायची लाज वाटु लागली. त्यांच्या कडे पाहुन लोकं हसायला लागले "आता तर बापुरावचे वावर गेले, बुडाले सावकाराकडं " वगैरे बोलभाषा लोकं बोलायला लागले. बापुरावजींना आणखीनच वाईट वाटू लागले. मनात वाईट विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली. एकीकडे पत्नी व लहानग्या मुलांचा विचार व दुसरीकडे कर्जाचा वाढता डोंगर. एके दिवशी बापु...