लहानुबाबा दीन दु:खीतांचे कैवारी दुःखीतांचे कैवारी श्रीसमर्थ लहानुजी महाराजामध्ये सद्गुरू कृपेने आत्मज्ञानाची फळे यायला लागली. निष्काम सेवेने जनप्रिय झाले. "जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्य सांभाळावी" आहे मन निर्विकारी झाले. चित्तचतुष्ट निरोधन केले. आत्मरत वृत्ती झाली. जगती जनार्दन ।। दिसायला लागला. दीनदुःखीतांच्या क्लेशात सहभागी व्हायला लागले. गंगापूर । क्षेत्री वनौषधी देऊन कित्येकांना व्याधी मुक्त केले. त्यात धन्यता वाटायला लागली. संतांची पायवणी घेण्यास जनमनाची लाज मानली नाही. शरीर कष्टवून जेवढा परोपकार करणे शक्य होईल तेवढा परोपकार करायचे. देवपूजा, राऊळी परिक्रमा, एकादशी करणे, व्रत उद्यापनासारखे धार्मिक विधिकृत्ये कमी झाली. उलट मंदिराकडून कोणी जाणारा पांथस्थ भेटला तर त्याची विचारपूर करायचे. त्याचे जवळ ओझे असेल तर ते आपणाकडे घेऊन त्यांचा भार हलका करायचे. आपलीच स्वतःची धड सोय नाही, पायही लांब होऊ शकत नाही एवढी जागा, पण त्या मर्यादित कुटिचे गंगापूर स्थळी पथिकास ते आसरा द्यायचे. प्रवाशास कुणाचे घर पाहिजे असेल तर ती व्यवस्था करायचे. सोय नसेल तर आपणाकडे आश्रय द्यायचे. ते म...