मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

स्व. माधवरावजी लादे ; सातरगांव अनुभव / साक्षात्कार

  लहानुभक्त स्व. माधवराव लादे ; सातरगांव  सुदैवाचा ठेवा माधवराव लादे हे सातरगावचे राहणारे. साधा, भोळा माणूस तपोनिष्ठ श्रीलहानुजी बाबांच्या प्रखर कीर्तीमुळे हे टाकरखेडकडे वळले. माधवरावची अखंड सेवा सुरू झाली. शुध्द सेवेपायी समर्थाचे मन प्रसन्न झाले. पाचवर्षे कशी गेली आठवले नाही. "खऱ्या सेवकाची स्थिती ओळखावी । व्यवस्था पाहिजे तैशी करावी ।।" कधी कुणाशी काही न बोलणारे बाबा एक दिवस हाक मारतात- "माधवराव !" "जी बाबा !" अशी हाक देत माधवराव धाऊन आले. "तुम्ही गावी जा तुमचे काम झाले. तुमची सेवा  संपली !"  "का बरं बाबा? काही चुकले का या सेवकाकडून ?" माधवरावांना अपार दुःख झाले. आपले काही चुकले तर नसेल ना? काय झाले असेल ? समर्थांनी का म्हटले असेल असे? असे विचार तरंग उठत होते. माधवरावांचा हृदयसागर हेलावत होता. लगेच समर्थ म्हणाले - "तुमची चाकरी पूर्ण झाली. हे घ्या तुमच्या सेवेचे फळ !" म्हणून पायातील पादुका काढल्या व माधवरावांच्या स्वाधीन केल्या. माधवरावांनी त्या अमूल्य ठेव्याचा सहर्ष स्विकार केला आणि स्वामीचे चरण धरले व ढसाढसा रडू लागले. ते एक...

लहानुजी महाराज संक्षिप्त जीवन - परिचय

  श्री   संत लहानुजी महाराज ; टाकरखेड ता. आर्वी जि. वर्धा जीवन - परिचय  जपी तपी ना भजनी,  योगी आत्मालापी निजसंवादी । विदर्भभाषी अंतर्ज्ञानी | लहानुजी गमती || विसाव्या शतकांतील वैदर्भीय संतमंडळीत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीसंत लहानुजी महाराजांनी श्रावणी पौणिमेस (दि. ६ ऑगस्ट १९७१) या मृत्युलोकाचा निरोप घेऊन निजधामी गमन केले ! त्या चंद्रग्रह्णाच्या दिवशी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत अनंतात विराम पावली ! जिवाजिवांना उत्क्रान्ति- पथावर आरूढ करण्याचे, त्यांच्या प्रगतीचा सोपान निविघ्न करण्यासाठी श्रमपूर्वक झिजण्याचे आपले सत्कार्य अखेरच्या श्वासापर्यंत करीत, रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी त्यांनी 'आम्ही जातो अमुच्या गावा । अमुचा रामराम घ्यावा' या भावनेने इहलोकीचा निरोप घेतला ! जगत् हितार्थ निरलसपणे कष्टणारा एक पुण्यात्मा या मृत्युलोकावरील आपला विहार संपवून-पूर्ण करून अनंतात विराम पावला ! लहानुजी महाराज गेले ! आतां त्यांची ती पावन वाणी, परमार्थ- पथावर मार्गदर्शक ठरणारी त्यांची ती लोकविलक्षण अस्सल वऱ्हाडी मराठमोळी वाणी पुन्हा ऐकू येणार नाही ...

डाँ. सुरेशचंद्रजी चेडे ; अकोला अनुभव / साक्षात्कार

अकोल्याचे डाँ. चेडे साहेबांचे अनुभव / साक्षात्कार...... ३) @ तापडीया नगर अकोला येथे श्री संत सत्यदेवबाबांनी बावाजीचे मंदिर बांधायला लावले...... सध्याचे अकोला निवासी डॉ. सुरेशचंद्र अंबादासपंत (अण्णासाहेब) चेडे हे लहानुजी बाबांचे निःसीम भक्त. सन १९६८ पासुन डाँ. साहेब लहानुबाबांच्या सेवाकार्यात रुजु झाले. स्वतः १९७८ मध्ये ते पंजाबराव कृषी विद्यापीठ (PKV) नागपुर येथे विभाग प्रमुख व महाराजबाग प्राणीसंग्रहालय प्रमुख या पदावर कार्यरत होते. अनेक मान्यवर व्यक्ती त्यांच्या सहवासात यायच्या त्यापैकी नागपुर विद्यापीठाचे कुलगुरु कै. दादासाहेब काळमेघ ; रावसाहेब देशमुख ; डॉ.श्री. कैकणी ; लहानुदास स्व. भगवंतरावजी पावडे ; ईत्यादी मंडळी. त्याकाळी टाकरखेडला जायला व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे आर्वी  वरुन पायी जावं लागायचं मुखी लहानुबाबांच नामस्मरण व भक्तांना आलेल्या अनुभवांच्या चर्चा करत टाकरखेडा गाठायचे व समर्थांचे दर्शन घ्यायचे असा नित्यक्रम सुरु होता. अशातच एकदा त्यांच्या मित्रांच्या आध्यात्मिक चर्चा सुरु असतांना असे ठरले कि व्रजेश्वरीच्या स्वामी मुक्तानंद महाराजांकडे आपण गेलो पाहीजे रेल्वे रिझर्व्हेश...

लहानुदास दिगंबर पाटील चौधरी ; देऊरवाडी अनुभव/ साक्षात्कार

लहानुदास श्री. दिगंबर पाटील चौधरी देऊरवाडी ता. दारव्हा जि. यवतमाळ यांच्या जीवन प्रवासातील चित्तथरारक प्रसंग..... २) क्षणात निसर्ग चक्रात बदल करणारा लहानुजी बाबांचा परमोच्च कोटीचा अधिकार.. सन १९७० मध्ये देऊरवाडी (लाड) ता. दारव्हा जि. यवतमाळ येथील लहानुभक्त श्री. दिगंबर पाटील चौधरी हे नेहमीच्या टाकरखेड वारीला आर्वी येथुन पायी चालत निघाले. पावसाळा संपल्यानंतरचा काळ होता. चालता चालता वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लहानुबाबांवर लिहिलेल्या एका भजनातील ओळीचे त्यांना स्मरण झाले. त्या भजनात राष्ट्रसंत लहानुजी बाबांच्या सामर्थ्याचे वर्णन करतात तू वैद्य राज से वैद्य बडा | तेरे मिट्टी मे भारी दुआ चमके || लहानुजी नाम तो छोटा है । पर काम तेरा अस्मान डरे || या वर्णनाबद्दल चौधरीजींच्या मनात शंका प्रगट झाली कि खरोखरच हे खरे असेल काय? लहानुजी बाबांना आभाळ भिते काय? हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. दिगंबर पाटील असा विचार करत करत टाकरखेड्याच्या जवळपास पोहचले अगदी थोड्याच अंतरावर मंदिर परिसर राहला होता. निसर्ग वातावरण पहाता अतिशय स्वच्छ असे वातावरण होते. पाऊस येण्याची यत्किंचीतही शक्यता नव्हती. त...

श्री. अशोकरावजी दांडगे ; नांदगांव ( खंडेश्वर ) अनुभव / साक्षात्कार

काही निवडक अनुभव साक्षात्कार १ ) # दांडगे कुटुंब टाकरखेडचे वारकरी झाले... .. नांदगांव खंडेश्वर जवळील चिखली ( वैद्य) या गावातील रहिवाशी गृहस्थ श्री. बापुरावजी दांडगे यांच्या आयुष्यात १९६९ मध्ये एक असा प्रसंग आला कि त्यांच्याकडे असलेले ३ एकर शेत त्यांना सावकाराकडे गहाण ठेवण्या शिवाय पर्याय नव्हता. पत्नी सौ. मिराबाई लहान एक मुलगा व दोन मुली एवढे त्यांच्या परिवारातील सदस्य. आपल्या परिवाराच्या हितास्तव बापुरावजींना नाईलाजाने त्यांचे शेत १२०० रुपयात सावकाराकडे गहाण ठेवावे लागले. दिवसा मागुन दिवस निघुन जात होते परंतु बापुरावजी कडे सावकाराचे पैसे व्याजासहित परत करण्याची सोय जुळत नव्हती. काही दिवसांनी हिच रक्कम व्याजासहित १५०० रु एवढी झाली. बापुरावजीला गावामध्ये लोकांना तोंड दाखवायची लाज वाटु लागली. त्यांच्या कडे पाहुन लोकं हसायला लागले "आता तर बापुरावचे वावर गेले, बुडाले सावकाराकडं " वगैरे बोलभाषा लोकं बोलायला लागले. बापुरावजींना आणखीनच वाईट वाटू लागले. मनात वाईट विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली. एकीकडे पत्नी व लहानग्या मुलांचा विचार व दुसरीकडे कर्जाचा वाढता डोंगर. एके दिवशी बापु...

साक्षात्कार बावाजीच्या लीला

  संतती योग मनकर्णिकबाई साऊरकर ह्या बेलूरकरांच्या आजी. रा. मो. बेलूरकांचे लग्नाला बारा वर्षे झालीत. पण संतती नाही. म्हणून म्हाताऱ्यांची मने थोडी दुःख होती. एक दिवस मनकर्णिकाबाई समर्थाचे दर्शना करिता आल्या. भक्तसंकटमोचन शांत बसले होते. मनकर्णिकाबाईने जाता बरोबर समर्थांचे पूजन केले. पाय धरले आणि मनोकामना आपल्या अंतरीच प्रगट केली. तसेच महाराज म्हणाले - 'बीज  अंकुरले । रोप वाढिले ।' खरोखर तसेच झाले. पुढे अल्पावधीतच पुत्ररत्न प्राप्त  झाले. मनकर्णिकाबाईस आनंद झाला. असा आहे. समर्थाचा पुण्यप्रताप तशी मनकर्णिकाबाईची समर्थांचे चरणी अपूर्व श्रध्दा. यामुळे अधिकच दुणावली. आसवां अशाच प्रकारे धनोडीचे श्रीराम नारायणराव देशमुख यांचे बरेच दिवसाचे लग्न झाले पण संतती नाही. तथापि त्यांचा पूर्ण विश्वास होता की, समर्थ आपले येथे वंशदिवा लावेलच. याप्रमाणे एक दिवस हे टाकरखेडला आले. समर्थांचे दर्शन घेतले. पूजन केले. पत्नी सौ. जिजाबाई सोबत होत्या. त्यांनीही समर्थांचे पूजन करून नमस्कार केला. समर्थांनी जिजाबाईचे पदरात एक फळ टाकले. तोच एक वर्षानी बाळाचा जन्म झाला. आज तोच श्रीरामपंत देशमुखांचा कुलदिप...

गोरक्षण

 गोरक्षण मध्ये आजच्या तारखेला जवळपास ५५० लहान मोठ्या सहित गाई आहेत.