// सद्गुरु समर्थ लहानवें नम : // श्री. सुरेशराव रघुपतीराव देशमुख टाकरखेड आर्वी यांचेवर ओढवलेला प्रसंग जाको राखे साई, मार सकेना कोई || हिन्दीतील वरील वाक्प्रचारासारखाच प्रसंग माझेवर आला असता समर्थ लहानुजी बाबांनी माझे कसे प्राण वाचविले त्याबाबतचा हा लेखन प्रपंच… साधारणत: सन १९७३-७४ मधील ही घटना आहे. आजही ती घटना जणू काही काल परवाच घडून गेली इतकी ताजी आहे. घटना कशी घडली त्याचे सविस्तर वर्णन… माझी चुलत बहीण सौ. लताताई भाऊसाहेब पवार, भडगांव जि. जळगांव ( खानदेश ) हिला दिवाळी निमित्त्य घ्यायला जायचं होते. पुलगांव ते जळगांव साधारणतः सात - आठ तासांचा प्रवास होता. रात्री ११. ३० वाजता पुलगांववरुन बसायचं ठरलं. रात्रीच्या गाडीला वेळ असल्यामुळे जेवणाचा डबा आणला होता जेवण केले. गाडी बरीच लेट होती. जशी गाडी स्टेशनवर आली तशीच प्रवाशांची गर्दी अतोनांत झाली. माझ्याकडे जनरलची तिकिट होती. थंडीचे दिवस असल्यामुळे सर्वच डब्याचे दरवाजे बंद होते कुणीही दरवाजे उघडत नव्हते. एवढ्यात गाडी सुटण्याची वेळ झाली व गाडीने हळूहळू वेग धरायला सुर...